जड़ों की मजबूती और अधिक पैदावार के लिए ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP) बना किसानों की नई पसंद; जानें इसके फायदे और उपयोग का सही तरीका।
ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP) क्या है और यह कैसे बनता है?
पिकांच्या वाढीसाठी फॉस्फरस हा अत्यंत आवश्यक घटक आहे. बाजारात फॉस्फरससाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी ‘ट्रिपल सुपर फॉस्फेट’ (TSP) हा एक अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली पर्याय म्हणून समोर येत आहे. टीएसपीचा ग्रेड 0:46:0 असा आहे, ज्याचा अर्थ असा की यात प्रामुख्याने फक्त फॉस्फरसवर लक्ष केंद्रित केले जाते. हे खत फॉस्फेट खडकावर फॉस्फोरिक ऍसिडची प्रक्रिया करून बनवले जाते, ज्यामुळे यात ४४ ते ४६% शुद्ध फॉस्फरस मिळतो. हे सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) पेक्षा कितीतरी पतीने अधिक शक्तिशाली आहे.
टीएसपी (TSP) चे वैज्ञानिक फायदे आणि वैशिष्ट्ये
टीएसपीमध्ये असणारा ४६% फॉस्फरस हा ९० ते ९५% पाण्यात विरघळणारा असतो, ज्यामुळे तो पिकांच्या लहान मुळांना लगेच उपलब्ध होतो. याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
-
थेट शोषण: यात फॉस्फरस ‘ऑर्थो फॉस्फेट’ स्वरूपात असतो, जो मुळे थेट शोषून घेऊ शकतात.
-
जमिनीचा पीएच सुधारणे: टीएसपीचा पीएच १ ते ३ (आम्लधर्मी) असतो. त्यामुळे ज्या जमिनी अल्कधर्मी (pH ७ पेक्षा जास्त) आहेत, तिथे अडकून बसलेला फॉस्फरस मोकळा करून तो पिकांना उपलब्ध करून देतो.
-
कॅल्शियमचा बोनस: डीएपीमध्ये कॅल्शियम मिळत नाही, पण टीएसपीमध्ये सुमारे १५% कॅल्शियम असते, जे झाडांच्या पेशींच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
डीएपी (DAP) आणि टीएसपी (TSP) मधील फरक
अनेक शेतकरी डीएपी आणि टीएसपीमध्ये गोंधळून जातात. दोन्हीमध्ये ४६% फॉस्फरस असला तरी मोठा फरक त्यांच्या स्वभावात आहे. डीएपी हे अल्कधर्मी आहे, तर टीएसपी हे आम्लधर्मी आहे. डीएपीमध्ये नायट्रोजन असतो, तर टीएसपीमध्ये नायट्रोजन नसून त्याऐवजी मौल्यवान कॅल्शियम असते. विशेषतः ज्या जमिनींचा पीएच जास्त आहे, तिथे डीएपीपेक्षा टीएसपी वापरणे अधिक फायदेशीर ठरते कारण ते जमिनीतील इतर पोषक तत्वे देखील मोकळी करण्यास मदत करते.
वापरण्याची पद्धत आणि शिफारस केलेली पिके
टीएसपी हे मका, गहू, तांदूळ यांसारख्या तृणधान्यांसाठी आणि सोयाबीन, हरभरा, भूईमूग यांसारख्या कडधान्यांसाठी अत्यंत प्रभावी आहे. तसेच केळी, द्राक्षे, डाळिंब आणि सर्व प्रकारच्या पालेभाज्यांसाठी हे खत उपयुक्त आहे. सर्वोत्तम परिणामांसाठी टीएसपीचा वापर ‘बेसल डोस’ म्हणून पेरणीच्या वेळी किंवा पेरणीपूर्वी जमिनीतून देणे योग्य ठरते. साधारणपणे एकी २५ ते ५० किलो टीएसपी वापरण्याची शिफारस केली जाते. मुळांच्या जवळ खत दिल्यास (बँड प्लेसमेंट) त्याचा सर्वाधिक फायदा पिकाला होतो.
तुमच्या जमिनीचा पीएच जास्त असल्यास डीएपी ऐवजी टीएसपीचा वापर करून पहा आणि पिकाच्या वाढीतील फरक स्वतः अनुभवा. खतांचा वापर करण्यापूर्वी माती परीक्षण करणे केव्हाही उत्तम.